wisdom365.co.in
Spiritual in Marathi

Spiritual in Marathi

Sharing is caring!

आता तुम्ही भीती दाखवून एखाद्याला नैतिक बनवू शकत नाही .

विसाव्या शतकामधील क्रांतिकारक शोधांमुळे असे म्हणण्याची वेळ आली आहे की , ईश्वराची निर्मिती ही आपण आपल्या भीतीपोटी निर्माण केली होती व त्या ईश्वराचा शोध तर आपल्याला अजूनही लागू शकलेला नाही . ज्याला आपण ईश्वर म्हणतो व ज्या ईश्वराची निर्मिती आपण केली होती , त्यामागे आपले भयच कारणीभूत होते .

बदलत्या काळात त्या ईश्वराची प्रतिमाही फेडआऊट झाली आहे . आता नरक व स्वर्ग या केवळ कविकल्पना उरल्या आहेत ; परंतु आजपासून काही शतकांपूर्वी मात्र या संकल्पना फारच अद्भुत वाटत होत्या आणि तत्कालीन मानव हा त्यांना घाबरूनच जगत होता .

स्वर्गसुखाची लालूच दाखविल्याने माणूस भिऊन का होईना नीतिमत्तेचे आचरण करीत होता ; परंतु आज आपली सर्व भये गळून पडली आहेत , माणूस निर्भय बनला आहे . या निर्भय माणसावर जुने नीतिनियम लागू होत नाहीत . नीतिमत्तेच्या जुन्या संकल्पना या जुन्या पिढीबरोबरच मृत झाल्या आहेत . परंतु प्रश्न हा आहे की ,म्हणून काय मग मानवजातीतील अनीतिवान बनू द्यायचे का ? काय मनुष्याच्या अभय व निर्भय बनण्याचा अर्थ हा होतो की , त्याने अनैतिक बनावे ? आणि जर असे घडले , तर समाज निरंतरपणे धोक्याच्या खाईत लोटला जाईल .

कारण नैतिक असण्याचा एकच अर्थ निघतो तो म्हणजे मी दुसऱ्या व्यक्तीचीही चिंता करतो , मी एकटा नाही . मी या पृथ्वीवर आपल्या साथीदारांसह राहत आहे . माझ्या चारी बाजूला शेजारीच शेजारी आहेत आणि मी त्या सर्वांसाठीही जबाबदार आहे . नैतिक आचरणाचा आधार हा एवढाच – मर्यादित आहे .

परंतु आजवर आपण भयाच्या आधारावर या बाबीला सुरक्षित ठेवले होते . धर्माच्या कायद्याचे भय होते , धर्मगुरुरूपी पोलीस चौकाचौकात उभे होते . कोर्टात ईश्वर बसला होता , मॅजिस्ट्रेट बनून सर्वांचा न्यायनिवाडा करायला तो वर बसून हे ठरवित होता की , कोणाला स्वर्गात पाठवायचे आणि कोणाला नरकात . परंतु विसाव्या शतकात झालेल्या सायन्स व तंत्रज्ञानामधील नवनवीन शोधांच्या क्रांतीमुळे हे सिद्ध झाले आहे की , आपण ज्याला ईश्वर म्हणत होतो त्याची निर्मिती आपण भयापोटी निर्माण केली होती व हजारो वर्षांनंतरही त्याचा शोध काही कोणाला लागलेला नाही . परंतु आताची नवीन पिढी ईश्वराचे महत्त्व जाणत नाही . त्या नवीन पिढीला आता स्वर्ग व नरकाची भीतीच उरलेली नाही . जुने धर्मगुरू , पंडित सर्व गायब झाले आहेत आणि संपूर्ण मनुष्यात एका निर्वात पोकळीत सापडली आहे . आता आपण त्या मनुष्यजातीला भीती दाखवून नैतिक बनवू शकत नाही .

381 total views, 2 views today

Sharing is caring!

One Reply to “Spiritual in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *