Marathi story for kids

अल्बर्ट आईन्स्टाईनची गोष्ट

Sharing is caring!

Marathi Story for Kids

बोधकथा

अल्बर्ट आईनस्टाईन हा जगविख्यात शास्त्रज्ञ . अल्बर्ट आईनस्टाईनला लहानपणी शिक्षणाची गोडी नव्हती . त्यामुळे ते काहीतरी कारण काढून शाळेत जाणं टाळायचे . मात्र त्यांना मनन , चिंतन करणं फार आवडायचं . एखाद्या विषयावर विचार करत ते तासन्तास घालवायचे . त्यात त्यांचा खूप वेळ जायचा , मग त्यांना शाळेत शिक्षेला सामोरं जावं लागायचं .

एक दिवस अल्बर्टने आपल्या आईवडिलांना सांगितलं की मी शाळेत जाणार नाही . आईने त्याचे कारण विचारलं . तेव्हा तो म्हणाला , आई तिथे शिक्षक नाही पोलीस शिकवतात . लहानलहान कारणांवरून रागवतात , ओरडतात आणि गणित हा विषय तर मला खायला उठतो .

अल्बर्ट हे सगळं सांगत असताना अल्बर्टचे काका जेकब तिथे बसलेले होते . ते हे सगळं ऐकत होते . अल्बर्टचं सांगून झाल्यावर ते म्हणाले , बेटा तू हे काय सांगत आहेस की , तुझं मन गणितात लागत नाही का ? अल्बर्ट म्हणाला , खेळात माझं मन जास्त लागतं काका.

जेकब म्हणाले , मग चल आपण खेळू या . जेकबने घराबाहेर अंगणात काही रेषा काढल्या आणि त्या रेषांमध्ये ते काही गोट्या सरकवू लागले . लहान अल्बर्टची खेळातली आवड व कौशल्य पाहून जेकब म्हणाले , अल्बर्ट अरे हेच तर बीजगणित आहे . त्यात संख्यांचा शोध घ्यावा लागतो . काका पण मला तर यात अवघड असं काहीच वाटलं नाही .

गणित जर इतकं सोपं असेल तर मी शाळेत जायला तयार आहे .

तात्पर्य : विद्यार्थ्यांना विषय सोपा करून सांगणे हे शिक्षकाला जमायला हवं . त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण होऊ शकेल .

Read more दुःखातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग

106 total views, 3 views today

Sharing is caring!

3 Replies to “अल्बर्ट आईन्स्टाईनची गोष्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *