You are here

Ekka Rajachi Gosht

Bodh Katha in Marathi Ekka Rajachi Gosht Marathi Kids Stories Bodh Katha Bodh Katha Moral Stories in Marathi

Sharing is caring!

Ekka Rajachi Gosht

Bodh Katha in Marathi

बोधकथा असे म्हणतात की , मगधचा सम्राट बिबिसार याच्या राजधानीत एकदा विचित्र घटना घडू लागल्या . रोज कोणत्या ना कोणत्या घरात आग लागू लागली होती . यामुळे सारे शहरवासी त्रस्त होते . एके दिवशी ते सारे एकत्र जमून सम्राट बिंबिसारांकडे गेल व त्यांना सारी हकीकत सांगितली .

जनतेचा त्रास पाहन सम्राटांनी काही मार्ग शोधण्याचा विचार केला . ते शहरवासीयांना म्हणाले , ‘ जर आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या घराचे रक्षण केले तर आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकेल . ‘ त्यासोबतच सम्राटांनी अशी घोषणाही केली की , ज्यांच्या घरात आग लागेल त्यांना शहराबाहेर असलेल्या जंगलात  राहावे लागेल .

योगायोगाने एक दिवस नेमकी राजवाड्यालाच आग लागली . सम्राट त्याचवेळी राजवाडा सोडून जंगलाकडे
जाऊ लागला . साऱ्या दरबाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला , पण सम्राटांनी कोणाचेच ऐकले नाही . ते म्हणाले , ‘ माझा आदेश कुशागपुरातील प्रत्येक रहिवाशासाठी होता व तो माझ्यावरही लागू होतो .

मी माझ्या आदेशाचे उल्लंघन करू शकत नाही . जर मी असे केले तर जनतेला काय उत्तर देऊ शकेल . सम्राट जंगलात राह लागले . त्यांची शिस्तप्रियता व न्यायनिष्ठूरता पाहून प्रजेच्या मनातील त्यांचा आदर अधिकच वाढला . हळूहळू सर्वच शहरवासीयांची घरे जळून खाक झाली व ते जंगलात येऊन राह लागले . असे म्हणतात की , त्याच जंगलात मगधची नवी राजधानी तयार झाली . जी राजगृह नावाने प्रसिद्ध झाली .

Marathi Kids Stories Bodh Katha

Bodh Katha Moral Stories in Marathi

140 total views, 2 views today

Sharing is caring!

One thought on “Ekka Rajachi Gosht

Leave a Reply

Top
error: Content is protected !!