एकमेकांची सिगारेट ओढल्यामुळे एच .आय.व्ही. जंतुसंसर्ग होतो काय ?

Sharing is caring!

अपरिचित पुरुष किंवा स्त्री यांच्यापासून एच .आय.व्ही. संसर्ग होण्याची शक्यता किती आहे ? 

एच .आय.व्ही. ची लागण झालेल्या व्यक्तीच्या वीर्यात किंवा योनीस्रावात हा विषाणू आढळून येतो . अशा व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास या स्रावातील विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करून संसर्ग उद्भवू शकतो . ) केवळ त्याच्या / तिच्याकडे पाहून एखादी व्यक्ती एच . आय . व्ही . बाधित असल्याचे ओळखता येत नाही . सुपरिचित व्यक्तीचीदेखील पूर्वीची जीवनशैली स्वैराचारी नव्हती असेही कोणाला आत्मविश्वासपूर्वक सांगता येणार नाही . एखादी अपरिचित व्यक्ती लैंगिक संबंध इतक्या सहजपणे प्रस्थापित करते तेव्हा तो / ती अशा प्रकारचे लैंगिक संबंध अनेक व्यक्तींसोबत ठेवीत असल्याची शक्यता जास्त असू शकते . म्हणून अपरिचित व्यक्तींबरोबरचा लैंगिक संबंध नेहमीच धोकादायक समजला जातो . तथापि , अपरिचित व्यक्तीबरोबरच्या लैंगिक संबंधात मधून उद्भवणाच्या धोक्याबाबत वैज्ञानिक आकडेवारीतील अंदाज उपलब्ध नाहीत . परंतु अशा प्रकारची जोखीम प्रत्येकाने टाळणे उत्तम ठरू शकते यात शंका नाही .

तंबाखू , मावा , गुटखा यांसारख्या चघळण्याच्या तंबाखू प्रकारांमुळे एच .आय.व्ही. संसर्ग होतो काय ? 

नाही . या व्यसनांमध्ये गुंतल्यामुळे एच .आय.व्ही. संसर्ग होण्याची शक्यता नाही . तथापि , या सवयीमुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो . 

एकमेकांची सिगारेट ओढल्यामुळे एच .आय.व्ही. जंतुसंसर्ग होतो काय ? 

नाही . एच .आय.व्ही. बाधित व्यक्तीसोबत सिगारेटचा सामायिक उपयोग : करण्यात कोणताही धोका नाही . तथापि , धूम्रपानाचा कर्करोग विशेषतः फुप्फुसांच्या कर्करोगाशी फार जवळचा संबंध आहे . 

एच .आय.व्ही. बाधित व्यक्ती दुस – या व्यक्तीस चावल्याने एच . आय . व्ही . संसर्ग होतो काय ?  

पूर्वी सांगितल्याप्रमाणे लाळेमध्ये एच .आय.व्ही. चे प्रमाण खूप कमी असते . म्हणून एच .आय.व्ही.बाधित व्यक्ती निरोगी व्यक्तीस चावल्यास रक्तात एच .आय.व्ही. मिसळण्याची शक्यता अगदीच नगण्य असल्यामुळे त्याला संसर्ग होत नाही . या उलट एच .आय.व्ही. बाधित व्यक्तीचा निरोगी व्यक्तीने चावा घेतल्यास आणि तिला / त्याला तोंडात जखमा असल्यास , अशा व्यक्तीस एच .आय.व्ही.जंतुसंसर्ग होण्याचा तात्त्विकदृष्ट्या धोका असतो . परंतु व्यावहारिक दृष्टीने पाहिल्यास चावल्यामुळे एच .आय.व्ही. संसर्गाचा धोका नसतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . .

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!